अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतची मंगळवारी मतमोजणी दरम्यान पळशी, वनकुटे, ढवळपुरी येथे सत्तांतर झाले पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पळशी गावच्या लोकनियुक्त सरपंच पदी युवा नेतृत्व प्रकाश राठोड यांची निवड. वनकुटे गावच्या सरपंचपदी सुमन निवृत्ती रांधवण, ग्रामपंचायत सदस्य पदी भास्करराव शिंदे, ढवळपुरी गावच्या लोकनियुक्त सरपंच पदी भागाजी गावडे यांच्या पत्नी नंदा भागाजी गावडे यांनी प्रचंड मताधिक्य मिळवून विजयी झाल्याबद्दल अहमदनगर सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक मोहनराव रोकडे पाटील यांनी सर्वांचा सत्कार करून त्यांना मन:पूर्वक भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मोहनराव रोकडे म्हणाले की या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्व तयार होण्यास कशा पद्धतीने मदत होते. पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून समाजहीत जोपासण्यासाठी राजकारणात पुढे आले पाहिजे आणि समाजाचे सुसंस्कृतपणे नेतृत्व करायला हवे. पंचायत राज व्यवस्थेत काम करत असताना लोकहिताची कामं करताना गरज भासल्यास मी स्वतः सरपंच परिषदेच्या माध्यमातून पक्ष व पार्ट्यांचे जोडे बाजूला ठेवून मदत करण्यास नेहमीच तत्पर असू हा शब्द देतो.