Disha Shakti

Uncategorized

बेंबळी येथील महिला सभागृहाचे अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते लोकार्पन सोहळा संपन्न

Spread the love

धाराशिव प्रतिनिधी (विजय कानडे) दि.18 ऑगस्ट : धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे जिल्ह्यातिल पहिले महिला सभागृहाचे बांधकाम पुर्ण झाले आहे . त्या महीला सभागृहाच लोकार्पन सोहळा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते मंगळवार दि १६ आॕगस्ट रोजी संपन्न झाला आहे . तुळजापुर विधानसभेचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आमदार निधीतुन १० लक्ष रु महिला सभागृहासाठी निधी दिला होता.

या महिला सभागृहामुळे उमेद महिला बचत गटातिल महिलांना बैठकीसाठी व एकमेकांच्या अडी? -आडचणी सोडविण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाल्या बद्दल स्थानिक महिलांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील व अर्चनाताई पाटील यांचे अभार मानले . यावेळी बेंबळीच्या सरपंच सौ .वंदना कांबळे , पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी गावढे , प्रकाश शेळके, नंदाताई रसाळ, ग्रा .पंचायत सदस्य विद्या माने, सुशिलाबाई गावढे, आश्विनी कसपटे, उमेद महिला बचत गट संजिवनी शिडोळे, बनसोडे शकुंतला तसेच महिला व नागरिकांची उपस्थीती होती .


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!