प्रतिनिधी (रमेश खेमनर) दि.13 सप्टेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथल्या हिंदू-मुस्लिम विवाहातून युवकाचे सुरूवातीला अपहरण आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणात अटकेत असलेल्या आराेपींनी पाेलिसांसमाेर माहिती दिल्याचं समाेर आलं आहे.श्रीरामपूर इथला युवक दिपक बर्डे यानं मुस्लिम मुलीशी प्रेमसंबंधांतून विवाह केला हाेता. मुलीच्या कुटुंबियांनी तीव्र विराेध केला. त्यानंतर मुलींच्या घरच्यांनी दिपक याला मारहाण करत मुलीला घरी आणले. मुलगी ही पुण्याला असल्याची माहिती दिपकला मिळाली. यानंतर दिपक याने कामाच्या शाेधासाठी पुण्याला जाताे, असे घरात सांगितले. पण त्याचे त्यानंतर अपहरण झाले हाेते. तसे त्याच्या मित्रांनी सांगितले.
यानंतर दिपकच्या शाेधासाठी त्याच्या कुटुंबियांनी पाेलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाची दखल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी घेतली.नितेश राणे यांनी लव्ह जिहाद आणि हिंदुंना टार्गेट करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूरमध्ये माेर्चा काढण्यात आला होता. दिपक बर्डे याचा शाेध घेण्याची मागणी केली. दिपकच्या कुटुंबियांनी त्याच्या घातपाताची शक्यता या माेर्चात व्यक्त केली हाेती. यानंतर पाेलिसांनी बेपत्ता दिपकच्या प्रकरणात सात जणांना अटक केली. दिपक याची हत्या केल्याची माहिती आराेपींनी पाेलिस चाैकशीत दिली आहे. दिपकच्या मृतदेह आराेपींनी गाेदावरी नदीत फेकल्याचेही पाेलिसांच्या चाैकशीत समाेर आले आहे.