Disha Shakti

Uncategorized

नांदगाव तालुक्यातील पिंपराळे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Spread the love

नांदगाव प्रतिनिधी / खंडू कोळेकर : नांदगाव तालुक्यातील पिंपराळे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला गावातील सामाजिक एकोप्याच दर्शन झाले याप्रसंगी महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याबद्दल महिलांना सन्मानपत्र देत सन्मानित करण्यात आले खास आकर्षण हे मुलींच्या भाषणाने झाले त्यात प्रामुख्याने हर्षदा सातपुते शारदा सातपुते पुनम सातपुते निकिता सातपुते पूजा सातपुते चैताली मार्कंड यांचा सहभाग होता बिन्नर वकील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे प्रथम नागरिक सरपंच बाळू पाटील हे होते गावचे ग्रामपंचायत व सोसायटीतील सर्व सदस्यांची हजेरी होती पोलीस पाटील विजय बागुल हे हजर होते सूत्रसंचालन व आभार बबन शिंदे यांनी केले


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!