धाराशिव प्रतिनिधी (विजय कानडे) : धाराशिव तालुक्यातील तेर येथे ता.१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन महावितरण कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, जि.प.प्राथमिक शाळा, ग्रामिण रुग्णालय, तलाठी कार्यालय, उर्दू शाळा, पोलीस चौकी या ठिकाणी ध्वजारोहण करुण उत्साहात साजरा करण्यात आला . महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता श्री.भालचंद्र चाटे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच नाईकवाडी यांच्या हस्ते तर पोलीस चौकी मध्ये पोलीस हवालदार प्रकाश राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मुलींनी झांज पथक खेळाचे सादरीकरण करुण गावात प्रभात फेरी काढण्यात आली होती. यावेळी रविराज चौगुले, ईरशाद मुलानी , विलास पांढरे , मंडळ आधिकारी आनिल तिर्थकर, तलाठी प्रशांत देशमुख, पोलिस पाटील फातिमा मणियार, ग्रामपंचायत सदस्य व आंगणवाडी कर्मचारी व आशा कार्यकर्त्या व ग्रामस्थ उपस्थित होत्या.