Disha Shakti

राजकीय

तेरणा धरणात रासपा व आम आदमी पार्टी यांचे जलसमाधी आंदोलन.

Spread the love

धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव तालुक्यातील तेर येथे ता.२६ रोजी राष्ट्रीय समाज पक्ष व आम आदमी पार्टी तर्फे तेर, ढोकी, येडशी, तडवळा या चार गावची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी तेरणा धरण तेर येथे जलसमाधी आंदोलन केले. ता. १ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे चारगाव पाणीपुरवठा योजना चालू करा अन्यथा जलसमाधी आंदोलन करणार असा इशारा देऊन देखील जिल्हा प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज जलसमाधी आंदोलन केले.

यावेळी उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष -बालाजी वगरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद कुलकर्णी ,युवक जिल्हाध्यक्ष ,आण्णा बंडगर , तालुका अध्यक्ष सचिन देवकते ,तालुका उपाध्यक्ष सतीश डोलारे ,सोमनाथ धायगुडे , पवन माने ,विजय वैद्य, शिवाजी पडुळकर, आप्पा पडुळकर रमाकांत लकडे , जगन्नाथ देवकते तानाजी पिंपळे ,जिल्हा उपाध्यक्ष, राजपाल भैया देशमुख ,तालुका उपाध्यक्ष, दत्ता कांबळे तालुका सचिव, बबलू पवार तालुका अध्यक्ष आदिवासी सेल, केशव सलगर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनाजी आंधळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!