जिल्हा प्रतिनिधी/धम्मदिप भद्रे कांडाळकर : आज दि.1नोव्हेंबर 2022 रोजी नांदेड जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्री.भास्कर पाटील भिलवंडे यांची निवड करण्यात आली. यावेळी आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर साहेब, यांच्या अध्यक्षतेखाली पत्र व निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस जांभरुणकर साहेब, जिल्हा सरचिटणीस विक्रम देशमुख साहेब व नायगाव तालुका पक्ष निरीक्षक सुभाषजी गायकवाड साहेब युवकांचे जिल्हाध्यक्ष धनंजय भाऊ सूर्यवंशी जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष गजानन पापटवार साहेब नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडुरे सर श्यामजी चोंडे, युवक तालुका अध्यक्ष माधव पाटील बेंद्रेकर, विद्यार्थी चे जिल्हा उपाध्यक्ष गजानन पाटील पवार, पांडुरंग बागडे, माधव कोरे बालाजी शिंदे, साईनाथ बावणे आदि मान्यवर उपस्थित होते,