Disha Shakti

Uncategorized

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन ! वयाच्या 77 व्या वर्षी घेतला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास

Spread the love

प्रतिनिधी / प्रमोद डफळ : २६ नोव्हेबर २०२२, मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. मराठीसह बॉलीवुडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारे दिग्गज अभिनेते आणि आवाजाचे बादशाह विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 77 वर्षांचे होते. वयोपरत्वे प्रकृती खालवल्याने गेली पंधरा दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु औषधांचा कोणताही सकारात्मक परिणाम होत नसल्याने काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर शनिवारी 26 नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे मनोरंजन विश्वाशी घट्ट नाते होते. करोनाकाळात वयाची पंच्याहत्तरी असतानाही त्यांनी ‘गोदावरी’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. काही दिवसांपूर्वीच ते स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसले होते. या मालिकेत ‘मल्हार’च्या गुरूंची भूमिका त्यांनी साकारली होती. तर संजीव जयस्वाल दिग्दर्शित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या जीवनावर आधारित ‘आंबेडकर द लेजेंड’ या वेबसिरिज मध्येही ते झळकणार होते. या सिरिजमध्ये ते प्रमुख भूमिका म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारणार होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!