Disha Shakti

राजकीय

शिक्षक-पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या; निवडणूक आयाेगाचा निर्णय

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : शाळांना सुट्टी असल्याने मतदानावर परिणाम हाेऊ शकताे. त्यामुळे आता मुंबई आणि नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली हाेती. त्यावर निवडणूक आयाेगाकडून दखल घेण्यात आली आहे. 

 संघटनांची मागणी

लोकसभा निवडणुकीच्या पाठाेपाठ आता महाराष्ट्रात विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. परंतु, विविध शिक्षक संघटनांची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. येत्या १० जूनला होणारी पदवीधर निवडणूक १५ जूननंतर घेण्याची मागणी या विविध शिक्षक संघटनांनी केली हाेती. त्यामुळे आयाेगाने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!