धाराशीव प्रतिनिधी / विजय कानडे : मुंबई येथील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 160 अधिकारी ,कर्मचारी व नागरीक यांच्या स्मरनार्थ ढोकी पोलीस स्टेशन, होमगार्ड संघटना , पोलीस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने व पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कुमार कावत व कळंबचे उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये परिसरातील 226 रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले आहे. बार्शी येथील भगवंत रक्तपेढीच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साखरे पर्यवेक्षक गणेश जगदाळे, सुयोग निकम, ज्ञानदीप शिराळकर, राधिका बेले, सौरभ गायकवाड, सलोनी शिंदे यांच्या सहाय्याने रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना ट्रॅक सूट भेट देण्यात आला आहे. कॅन्डल दीप जाळून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक कपिल बुद्धेवार पोलीस कॉन्स्टेबल श्रीमंत क्षीरसागर, सुहास गवळी ,राजाभाऊ सातपुते, प्रदीप मुरळीकर, सुखदेव जाधव, दत्ता थाटकर, गोविंद खोकले पोलीस पाटील संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष राहुल वाकुरे मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, फातेमा मणियार, परेश शिंदे ,बिभीशन गवाड, फकीरनाथ कांबळे ,केशव बटनपुरे समाजसेवक शामराव देशमुख, संजय शिंदे इत्यादींची उपस्थिती होती.
HomeUncategorizedदहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर
दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर

0Share
Leave a reply