विशेष प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : (नागपूर) बोगस जात वैध्यता बळकाऊन हजारो गैर आदिवासिनी शासकीय सेवेत रुजू झाले. त्या अधिसंख्य जातचोरांना संरक्षण देण्याचं काम शिंदे -फडणवीस सरकारने केलं आहे.याचे तीव्र पडसाद आदिवासी समाजामध्ये पडले असून शासनाच्या विरोधात नागपूर येथे अधिवेशनावर लाखो आदिवासी बांधवांनी धडक मोर्चा काढला. यावेळी शासनाच्या छाताडावर बसुन हा निर्णय रद्द करण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली. यांनंतर शासनाच्या निर्णयाची अवमान याचीका दाखल करण्याचं ठरलं असून येणाऱ्या काही दिवसात सर्व संघटनेच्या वतीने Contempt of Court करण्यात येईल.
यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब, माजी मंत्री वसंतराव पूरके साहेब, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, माजी आमदार प्रा राजु तोडसाम, माजी आमदार डॉ संतोष टारफे, आमदार साहसराम कोरोटे, मधुकर उईके, हरीश उईके, जितेंद्र मोघे, दशरथ मडावी, राजेंद्र मरस्कोल्हे, दिनेश मडावी,सतीश पेंदाम, सुनील ढाले, भावना इरपाची , मंगला उईके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Leave a reply