पळशी प्रतिनिधी / काकासाहेब खाडे : दि :- ०६/१२/२०२२ श्री.ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या यावर्षीच्या १०९ व्या पुण्यतिथी उत्सवाची तयारी अंतिम टप्यात आलेली असून मागील दोन वर्षे कोवीडच्या महामारीमुळे उत्सवावरती देखील काही बंधने घालण्यात आलेली होती.परंतु यावर्षीचा उत्सव सोहळा सगळे रेकॉर्ड मोडीत काढत मोठ्या भक्तिभावाने तसेच उत्साहाने साजरा होणार असून त्यासाठी प्रशासनाने देखील कंबर कसलेली आहे.विद्युत रोषणाईमुळे गोंदवले नगरी देखील झगमगलेली आहे.रस्त्यावरील खड्डे भरण्यास देखील सुरवात झालेली असून श्रींच्या भक्तांमुळे गोंदवले नगरी भाविकांच्या गर्दीने भरण्यास सुरवात झालेली आहे.एस.टी प्रशासनाने देखील उशीरा का होईना पण जोरदार नियोजन करीत दहिवडी आगारा कडून सर्व ताकत लावलेली दिसून येत आहे.बसेसची माहिती पुकारणे चालू झालेले असून दहिवडी आगाराचे कामकाज देखील सुधारत असून श्रींच्या उत्सवाला दहिवडी आगाराची तयारी देखील अंतिम टप्यात दिसून येत आहे.
बसस्थानकात देखील हळू-हळू प्रवाशांची गर्दी होताना दिसत आहे.आता दहिवडी आगाराच्या जादा बसेसचे नियोजन कितपत श्रींच्या भक्तांच्या सेवेला तारणार की,नेहमी प्रणामे जरा काय प्रवासी लोकांची गर्दी झाली की पत्यांच्या बंगल्याप्रमाणे नियोजन देखील कोसळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.ट्रॉफीकचे नियोजन कशापद्धतीने असेल त्यासंदर्भात प्रशासनाने आराखडा तयार करण्यास सुरुवात केलेली आहे.येत्या काही दिवसांतच त्याबाबतचे ही नियोजन समजणार असून गोंदवले नगरी खूप मोठ्या विश्रांती नंतर गजबजणार आहे. बुधवार दि.०७ रोजी दत्तजयंती ,गुरुवार दि ०८ रोजी श्रींची पोर्णिमा आणि नंतर शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस असल्याने पुणे, मुंबई, बारामती, कराड आणि कोल्हापूर हुन येणाऱ्या भाविकांची संख्या ही मोठ्या प्रमाणावरती असणार आहे.रविवार दि.१८ डिसेंबर रोजी पहाटे ५.५५ मिनिटांनी श्रींच्या समाधीवरती गुलाल, फुलांची उधळण करत उत्सवाची सांगता होणार असून पुण्यतिथी सोहळा देखील रविवारीचं आल्याने गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघणार हे मात्र नक्की.
Leave a reply