Disha Shakti

राजकीय

तुम्हाला ४ तारखेला कळेल खरा डॉन कोण ? निलेश लंकेचा सुजय विखेंवर हल्लाबोल

Spread the love

विशेष  पारनेर प्रतिनिधी /  वसंत रांधवण : निलेश लंके यांनी कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी मला संपविण्याचा घाट घातला होता. माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तुमच्या पीएने पंधरा टक्क्यांनी पैसे जमा केले आहेत. तुमच्या पीएलाही पीए आहेत, असा आरोप लंके यांनी केला. तुम्ही एक तरी जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणले का ? केवळ आपले मेडिकल कॉलेज व आपली यंत्रणा चालविण्याचे काम ते करत आहेत. हेलिकॉप्टर ने फिरणारे हे लोक आहेत. गेली साडेचार वर्षे ही लोक जनतेमध्ये फिरली का असा सवाल करत कार्यकर्त्यांनो काळजी करू नका तुमच्यावर कारवाई होणार नाही कारण मीच खासदार होणार आहे, असा विश्वास आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला.

पारनेर तालुक्यातील सुपा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आमदार निलेश लंके यांनी विखे पिता-पुत्रावर घणाघाती टीका केली. ते पुढे म्हणाले, लंकेंनी पैसा नाही तर माणसं कमावली. लंके तुम्हाला मॅनेज होणार नाही. ते (सुजय विखे) म्हणतात मै हूं डॉन, पण चार तारखेला लोक सांगतील की खरा डॉन कोण आहे. खासदार दक्षिणेचे मात्र सगळे नेत्यांची कार्यक्रम उत्तरेत होतात. डाळ वाटण्यापेक्षा दुधाचे दर वाढवा, कांद्याला भाव मिळवून द्या अशी खोचक टीका आमदार लंके यांनी सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळत केली.

पारनेरकरांना भावनिक आवाहन

या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. ही पारनेरकरांची अस्तित्वाची लढाई आहे. प्रत्येकांने मी उमेदवार म्हणून बाहेर पडले पाहिजे. गावाचे गावे पॅक करा. आपल्या तालुक्याची अस्तित्वाची लढाई आहे, असे आवाहन निलेश लंके यांनी केली आहे. ते येतील पैसे देतील. पैसे घेऊन जा, अशी सांगायची भूमिका घ्या. आता उघड्या डोळ्याने पाहून उपयोग नाही. प्रत्येकाने निवडणूक हाती घेतली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची आहे, असे भावनिक आवाहन निलेश लंके यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!