शिखर शिंगणापूर प्रतिनिधी / सचिन पवार : मार्डी (शिपदरा) येथे सुप्रसिद्ध भक्ती गीत गायक श्री अनुप जलोटा उपस्थित राहून भजन व भक्ती गीत कार्यक्रम गायन करणार आहेत. सुप्रसिद्ध भक्ती गीत गायक श्री.अनुप जलोटा यांचा भक्तिमय कार्यक्रम समस्त घोलप परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार दिनांक 19/12/2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता पार्वती विश्वनाथ मंदिरात उद्योजक श्री घोलप शेठ यांनी आयोजित केला आहे. उद्योजक श्री घोलप शेठ यांनी मार्डी व परिसरातील सर्व भाविक भक्तांना जगप्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांचा भक्तिमय कार्यक्रम पाहण्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अहवान केले आहे.
HomeUncategorizedमार्डी (शिपदरा) येथे सुप्रसिद्ध भक्ती गीत गायक श्री.अनुप जलोटा यांच्या कार्यक्रमाचे आयोजन
मार्डी (शिपदरा) येथे सुप्रसिद्ध भक्ती गीत गायक श्री.अनुप जलोटा यांच्या कार्यक्रमाचे आयोजन

0Share
Leave a reply