Disha Shakti

Uncategorized

जवळा गावातील ग्रामस्थ घरकुलासाठी अखेर बसले उपोषणास

Spread the love

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : आर्णी तालुक्यातील जवळा हे गाव सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेले गाव व तितकेच राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे मात्र गेल्या कितेक वर्षा जवळा येथील ग्रामस्थांनी घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. शासन निर्णयानुसार 2022 सर्वांसाठी घरे हे धोरण रबिविण्यात येत आहे. मात्र जवळा येथील ग्रामस्थांना त्यांच्या जागेच्या, आठ अ, वर ग्रामपंचायत ची मालकी असल्यामुळे लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही आहे. व तसेच सरपंच आणि सचिवणे चुकीचा सर्वे केल्यामुळे अनेक लाभार्थी घरकुळापासून वंचित आहे. त्यांच्या जागेवर पक्के घर नसून सुधा सरपंचाने व सचिवाने त्यांचा जागेवर पक्के घर असे लिहिले आहे.जवळा गावात येथे कोणाकडेही टेलिफोन नसून सुधा 112 लाभार्थ्यांच्या घरी टेलिफोन असल्याने त्यांना लाभापासून वंचित ठेवले आहे.याकरिता जवळा येथील माजी उपसरपंच आणि भारत काळबांडे व अमोल टोपरे यासह अनेक गावकरी व महिला 2 तारखेला आर्णी येथील तहसील कार्यालया समोर उपोषणास बसले आहेत.

जवळा येथील ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात तहसीलदार यांना अतिक्रमण धारकांना नियमनुकुल करण्या संदर्भात मागणी केली व ही मागणी मान्य न झाल्यास 2 जानेवारी पासून उपोषण करणार असल्याचं इशारा सुद्धा करण्यात आला होता तरी सुद्धा शासन स्तरावर याचा विचार न करता एकही मागणी मान्य केली नाही त्यामुळे उपोषणास कर्त्यासह शेकडो पुरुष आणि महिला उपोषणास बसले आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!