Disha Shakti

Uncategorized

ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे आरोग्य व महरक्तदान शिबिराचे आयोजन

Spread the love

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : दिनांक ९ फेब्रुवारी गुरुवार ला ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे आरोग्य व महरक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मा.मंत्री महोदय, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार आज संपूर्ण राज्यभर आरोग्य शिबिर आणि महरक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आपल्या कर्तव्यदक्ष कार्यप्रणाली व निस्वार्थ रुग्णसेवेसाठी सुप्रसिद्ध असलेले यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय आर्णी, येथे रुग्णालयाचे वैद्दीकिय अधीक्षक डॉ. सुनील भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य व महारक्तदान शिबिर पार पडणार आहे.

आर्णी तालुकयातील व शहरातील समस्त नागरिकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. सध्यस्थिस्तीत रक्तपेट्ट्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून गरजू रुग्णांना आवश्यक असेल त्यावेळी रक्तपुरवठा व्हावा, याकरिता जस्तिस्त जास्त संख्येने शिबिरामध्ये रक्तदान करावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालय आर्णी वैद्दिकिय अधिक्षक व संपूर्ण कर्मचारी वर्गतर्फे करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!