Disha Shakti

Uncategorized

डॉ.धर्मराज सुरोसे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

Spread the love

अहमदनगर प्रतिनिधी /वसंत रांधवण : राष्ट्रभक्ती जनविकास संघटना आयोजित स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शेवगाव येथील महात्मा फुले ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक तथा राष्ट्रीय अटल फाउंडेशनचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष डॉ.धर्मराज एकनाथ सुरोसे यांना राष्ट्रभक्क्ती राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती संयोजक समितिकडून कळवण्यात आली आहे.

या पुरस्काराचे वितरण मा.खा राजू शेट्टी ,मा.आ.बच्चूभाऊ कडू , डॉ.ज्योतीताई विनायक मेटे, पद्मश्री. डॉ.पोपटराव पवार, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी ( डीवायएसपी ) डॉ.अविनाश सकुंडे साहेब ( अल्पसंख्यांक आयोग भारत सरकार ) आदी मान्यवराच्या हस्ते पुरस्कार सोहळा 12 फेब्रुवारी रोजी डॉ.नीतू मांडके आयएमए हाऊस शुक्रवार पेठ क्षेत्रीय कार्यालय शेजारी टिळक रोड पुणे. या ठिकाणी पुरस्काराचे वितरण होणार आहे .हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजिक, राजकीय, क्षेत्रातून डॉ.धर्मराज सुरोसे यांचे अभिनंदन होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!