पारनेर प्रतिनिधी / वसंत रांधवण : रत्नागीरी जिल्ह्यातील राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्त्येच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघ पारनेरच्या वतीने पारनेर तहसिल कचेरी व पोलीस स्टेशनला यासंदर्भातील निवेदन देण्यात आले.पारनेर तहसिल कचेरीमधे नायब तहसिलदार यांना तर,पारनेर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना निवेदन देताना राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हासचिव दत्ता गाडगे,तालुकाध्यक्ष विनोद गायकवाड,सचिव बाबाजी वाघमारे,खजिनदार संतोष कोरडे,वृत्तवाहीनी प्रमुख श्रीनिवास शिंदे,निघोज परिसर अध्यक्ष सागर आतकर,पत्रकार संतोष तांबे,संपत वैरागर,वसंत रांधवण, संजय मोरे,नितीन परंडवाल, आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हासचिव दत्ता गाडगे यांनी मयत पत्रकार वारीसे यांच्या कुटुबातील वारसाला शासकीय सेवेमधे घ्यावे तसेच कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, वारीसे यांच्या खुन्यांना कडक शिक्षा व्हावी व कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी केली अशी मागणी राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने केली.
या प्रकरणातील सर्व आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयामार्फत कोर्टाने व्हवी, हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
Leave a reply