धाराशीव प्रतिनिधी / विजय कानडे : शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र संत विद्यालयात बालआनंद बाजार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन इंडियन रेल्वेचे मुख्य प्रबंधक प्रदीप पौळ, माझी मुख्याध्यापक विश्वनाथ आबदारे, श्रीमती खटके, शाळेचे मुख्याध्यापक बेद्रे सर यांच्या हस्ते करण्यात आले.शाळेच्या प्रांगणात आयोजित मेळाव्यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावले होते. शैक्षणिक ज्ञानाबरोबरच, व्यवहारीक ज्ञान ,चलनाची ओळख, व्यापार कौशल्य, नफा तोटा व खरी कमाई यांची माहिती या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून बालआनंद बाजार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष एजाज बागवान, किरण आबदारे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षक मनीषा नरसिंगे, रणदिवे मॅडम, स्मिता पाटील , गांगुर्डे सर, गोडगे सर, वाघिरे सर, सूर्यकांत खटिंग , भंडारे सर आदिसह शिक्षक व शिक्षकोउत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांना मनीषा नरसिंगे, रणदिवे मॅडम व गांगुर्डे सर यांनी मार्गदर्शन केले.खरेदीसाठी मेळाव्यात परिसरातील पालक व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
Leave a reply