Disha Shakti

Uncategorized

परवानाधारक दारूची दुकाने गावहद्दी बाहेर , तुळजापूरच्या धरतीवर गोरोबाकाका मंदिर ट्रस्टवर कायम प्रशासक नेमा ग्रामसभेत ठराव मंजूर

Spread the love

धाराशीव प्रतिनिधी / विजय कानडे : गावचे मिनी मंत्रालय असलेल्या तेर ग्रामपंचायतची 27 जानेवारीला झालेली ग्रामसभा कोरम अभावी तहखूब झाली होती. ही ग्रामसभा शुक्रवार दिनांक24 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. तेरच्या सरपंच दीदी काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत रासपचे तालुकाध्यक्ष सचिन देवकते व ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात परवानाधारक दारूची सर्व दुकाने शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीना ये – जा करण्याच्या मुख्य रस्त्यावर असल्यामुळे मद्यपींच्या भीतीने भयभित होऊन , जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना तसेच गावातील महिला व नागरिकांना ये – जा करत असताना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही परवानाधारक दारूची दुकाने गावहाद्दी बाहेर काढन्याचा व श्री संत गोरोबाकाका मंदिरातील ट्रस्ट मंडळ बरखास्त करून आई तुळजा भवानी मंदिरासारखे कायम प्रशासकिय ट्रस्टची नेमनुक करावी या महत्त्वाच्या विषयांबरोबरच अतिक्रमणीत जागेच्या कबाल्याबरोबरच 8 अ देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत असे अनेक ठराव ग्रामसभेत घेण्यात आले.

यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, कृषी सहाय्यक मगर, उपसरपंच श्रीमंत फंड, अजित कदम, राम देशमुख, धनंजय आंधळे , पृथ्वीराज आंधळे, नामदेव कांबळे, अविनाश आगाशे, संजय लोमटे, प्रवीण साळुंखे, अमोल कसबे, लखन रसाळ तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!