दौंड प्रतिनिधी / नितीन पाटूळे : दि. २/३/२३ वार गुरुवार हा दिवस नाथाचीवाडीकरांसाठी आनंदाचा ठरला. कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला असून या विजयाचा आनंद दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी येथे गुलाल उधळीत व फटाके फोडून साजरा करण्यात आला. रविंद्र धंगेकर हे मूळचे दौंड तालुक्यातील(पिंपळगाव) नाथाचीवाडी येथील रहिवासी असून ते तेथे सतत भेट देत असतात.
धंगेकर यांच्या विजयामुळे कार्यकत्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.धंगेकर यांचे मुळ आडनाव झाडगे असून त्यांचे वडील हेमराज हे पुण्यात धंगेकर कुटुंबात दत्तक गेले आहेत, हेमराज हे सोन्या चांदीचे कारागीर म्हणून ओळखले जातात. नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी आपल्या मुळ गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले व करत राहतील असा नागरिकांना विश्वास आहे.दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी गावात विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. गावच्या विविध क्षेत्रातील कार्यक्रमाला धंगेकर वेळ काढून उपस्थित असतात.
कसबा पोटनिवडणुकीत धंगेकर यांची निवड झाल्यापासून प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून अखेरच्या क्षणापर्यंत नाथाचीवाडी येथील स्थानिक लोकांनी कसब्यात तळ ठोकला होता व प्रचार करत होते. दौंड तालुक्यात या निवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणावर होती, दौंड तालुक्यात राहुल (दादा) कुल हे विद्यमान आमदार आहेत, तर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्या रूपाने तालुक्याला दुसरा आमदार मिळाला आहे
Leave a reply