Disha Shakti

इतर

नायगाव शहरांमध्ये वीर स्वातंत्र्यसैनिकांचे स्तंभ अनधिकृत पाडणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्याची गजानन पाटील चव्हाण व गजानन पाटील तमलुरे यांची जिल्हाधीकाऱ्यांकडे मागणी

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव :नायगाव शहरांमध्ये वीर स्वातंत्र्यसैनिकांचे स्तंभ अनधिकृत पाडणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्याची गजानन पाटील चव्हाण व गजानन पाटील तमलुरे यांची जिल्हाधीकाऱ्यांकडे मागणीनायगाव शहरांमध्ये वीर स्वातंत्र्यसैनिकांचे स्तंभ अनधिकृत पाडणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्याची गजानन पाटील चव्हाण व गजानन पाटील तमलुरे यांची जिल्हाधीकाऱ्यांकडे मागणी नायगाव शहरांमध्ये मध्यवस्तीमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा तैवत ठेवून ज्या वीरांनी निजामांना सळो पळो करून सोडले होते, अनेकांनी कित्येक वर्ष तुरुंगवास देखील भोगला, कित्येकांनी आपल्या परिवारापासून अनेक वर्ष दूर काढली, मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा वीर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ स्तंभ नायगाव शहरांमध्ये 27 मे 1960 रोजी उभारले होते.

हा स्तंभ 2023 मध्ये नायगाव नगरपंचायत च्या सत्ताधिकाऱ्यांनी व संबंधित प्रशासनानी मस्तीची गुर्मी दाखवत कुठलेही ठोस कारण नसताना कुठलीही परवानगी न घेता दुसरे स्तंभ न उभारता स्वातंत्र सैनिकांचे स्तंभ अमृत महोत्सव या वर्षांमध्ये निस्तनाबूत केले. त्या विरोधात सर्वसामान्य जनतेत एक रोशाचे वातावरण निर्माण झाले असून नायगाव शहरातील भाजपा तथा सामाजिक कार्यकर्ते गजानन शंकरराव पा. चव्हाण, व शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन रामराव पा. तमलुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धाव घेऊन संबंधित दोषी असणाऱ्या वर कठोर कार्यवाही करावी अन्यथा या विविध जनहितार्थ विषयासाठी 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्यात येईल असा इशारा दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!