Disha Shakti

Uncategorized

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनलची बाजी

Spread the love

इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक पार पडली यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनल व डॉ. शशिकांत तरंगे व बाळासाहेबांची शिवसेना तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील व इतर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी नेते यांनी स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल यांच्यात लढत झाली तर भाजप पक्षाने नेते हर्षवर्धन पाटील यांनी या निवडणुकीत भाग घेणार नाही हे आधीच जाहीर केले होते.

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व आमदार दत्तात्रय भरणे यांनी एकत्र येत, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत, शेतकरी विकास पॅनलच्या चार जागा बिनविरोध करत, १४ जागांसाठी उमेदवार उभे केले होते. विरोधी पॅनलला धूळ चारत शेतकरी विकास पॅनलने १४ जागांवर घवघवीत मताधिक्य मिळविले. विजय अक्षरश: एक हाती मिळवला आहे. विरोधी पॅनलला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. तब्बल १८ उमेदवार शेतकरी विकास पॅनलचे विजय झाले आहेत.

इंदापूर येथे कर्मयोगी शंकरराव पाटील सभागृहात शनिवार दि. २९ एप्रिल रोजी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल, निवडणूक निर्णय अधिकारी जिजाबा गावडे यांनी जाहीर केला. सकाळी उशिरा प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल हाती आले.

यामध्ये कृषि पतसंस्था सर्वसाधारण मतदार संघातून सात विजयी झालेले उमेदवार आप्पासाहेब नानासाहेब जगदाळे (मते २२३७), मनोहर महिपती ढुके ( मते २०३८ ), संग्रामसिंह दत्तात्रय निंबाळकर ( मते २२८७ ), संदीप चितरंजन पाटील ( मते २२२७ ), दत्तात्रेय सखाराम फरतडे ( मते २२७१ ), विलास सर्जेराव माने ( मते २२४४ ), रोहित वसंत मोहोळकर ( मते २२७५ ), या मतदारसंघात विरोधी पॅनलच्या उमेदवारांना पराभूत उमेदवार अशोक घोगरे ( ६६२मते ) वगळता इतर उमेदवारांना मताच्या वरती आकडा गाठता आला नाही.परंतु कोणताही राजकीय पाठिंबा नसताना विरोधी पॅनलने तशी मोठी मजल मारली आहे.या मतदारसंघात पंधरा उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते.

तर कृषिपतसंस्था महिला प्रतिनिधी मतदार संघातून सहा उमेदवारांमध्ये लढत झाली यामध्ये मंगल गणेशकुमार झगडे ( मते २१२६ ), व रुपाली संतोष वाबळे ( मते २१५२ ) हे उमेदवार विजयी झाले आहेत.व कृषिपतसंस्था भटक्या विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातून तीन उमेदवारांमधील लढत झाली. यामध्ये आबा गणपत देवकाते ( मते २२५६ ) विजय झाले.तसेच कृषिपतसंस्था इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदार संघातून तुषार देवराज जाधव यांनी २३७६ मताधिक्य घेत विजयाची पताका फडकवली.

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून मधुकर विठोबा भरणे यांनी ८६६ मते मिळवत विक्रमी विजय मिळवला व याच मतदारसंघातून संतोष नामदेव गायकवाड यांना ७६७ मते मिळवून विजय मिळवला आहे.या मतदारसंघात सहा उमेदवार उभे होते.ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार अनिल बबन बागल (मते ७८९) मताधिक्य घेत घवघवीत विजय मिळवला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी वेगळे झालेले पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व आमदार दत्तात्रय भरणे एकत्र आले व कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर निवडणुक १८ – ० असा निकाल आज समोर आला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!