Disha Shakti

इतर

कर्जुले पठार येथे अन्न व औषध प्रशासन विभागाची अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

Spread the love

अ.नगर जिल्हा प्रतिनिधी / युनूस शेख : संगमनेर तालुक्यातील पठार भागात अवैध गुटखा विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असून मोठ मोठे साठेबाज पठार भागात आहेत. या अवैध गुटखा विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने कर्जुले पठार गावच्या शिवारातील अवैध गुटखा विक्रेत्यांवर मंगळवार दि. १६ मे रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास छापा टाकत कारवाई केली आहे.या कारवाईत एकूण तेरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील एका आरोपीस अटक केली आहे तर दुसरा फरार झाला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाने पठार भागात कारवाईचा बडगा उगारला असून एक गुटखा विक्रेत्याने गुटखा विक्रीचे उद्देशाने अवैध गुटखा साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर अधिकच्या चौकशीत दुसऱ्या अवैध गुटखा पुरवठादारास कारवाईची चाहूल लागताच तो पसार झाला आहे.सदर कारवाई अन्न व औषध सुरक्षा अधिकारी डॉ. प्रदीप पवार यांनी सापळा रचत कौतुकास्पद कारवाई केली आहे.

अन्न व औषध प्रशासनास गुप्त बातमीदार यांचे माध्यमातून अवैध गुटखा विक्री व साठवणूक केलेल्या दुकांनाची आणि घराची माहिती प्राप्त झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पठार भागातील कर्जुले पठार गावच्या शिवारात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या गुरुदत्त मंगल कार्यालयाच्या समोरील चंद्रकांत शिवाजी घुले यांचे मालकीचे मे सुदर्शन ट्रेडर्सवर आधिकारी डॉ प्रदीप पवार यांनी पथकासह छापा टाकला असता यात घराची व दुकानाची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला हिरा पान मसाला,आरएमडी पान मसाला, एम सेंटेड टोबॅको, रॉयल ७१७ सुगंधित तंबाखू,विमल पान मसाला असा विनापरवाना मुद्देमाल विक्रीसाठी साठवून ठेवलेला आढळून आला असून यात एकूण तेरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत केला आहे.

अन्न व औषध सुरक्षा विभागाने या कारवाईत कर्जुले पठार येथील चंद्रकांत शिवाजी घुले यांचे घरात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला अवैध गुटखाचा साठा जप्त करून त्यांना घारगाव पोलिसांच्या ताब्यात देत अधिकची चौकशी केली असता त्यांनी प्रथमतः उडवा उडविची उत्तरे दिली.परंतु हा गुटखा कुठून आणि कसा आणला याची चौकशी केली असता त्यांनी अवैध गुटखा पुरवठादार प्रभाकर गुळवे यांचेकडून आणला असल्याची कबुली दिल्याने जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित अन्न पदार्थाचा पठार भागात होणारा चोरटा व्यापार थांबवण्यासाठी चंद्रकांत घुले व प्रभाकर गुळवे यांचेवर महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार विविध कलम नुसार अन्न सुरक्षा आधिकारी डॉ.प्रदीप पवार यांचे फिर्यादीनुसार घारगाव पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर करत आहे.

दरम्यान पठार भागात अवैध दारू , गांजा ,गुटखा विक्रीचे पेव फुटले असल्याची चर्चा सुरू आहे.यामुळे गुटखा ,दारू,गांजा किंग सध्या आर्थिक दृष्टया प्रबळ झाले असून नागरिकांत असुरक्षितता पसरली आहे.अमली पदार्थ तस्करीचे पुरवठादार यांचे आंतरराज्य अमली पदार्थ तस्करी करणारे टोळीशी संबंध असल्याचे बोलले जात आहे.यातून अवैध गुटखा विक्री करणारे तसेच पुरवठादार यांचे माध्यमातून अधिक गुटखा तस्करांची टोळीच्या मुळापर्यंत पोहचण्याचा मार्ग घारगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना मिळाला आहे.आता यावर ते कशी आणि काय कारवाई करतात याकडे संपूर्ण पठार भागाचे लक्ष केंद्रित झाले आहे.तर अवैध दारू विक्रीचे प्रमाण पठार भागात वाढले असून जेवणावळीचे हॉटेल्स , ढाबे,चायनीज सेंटर, टपऱ्यानवर देखील दारू मिळू लागल्याने समाजात वादाचे प्रमाण वाढले असून हाणामारी, शिवीगाळ अशा अनेक किरकोळ गुन्ह्याची संख्या वाढू लागले आहे.मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई शून्य दिसून येत आहे.

कोट (सामाजिक कार्यकर्ते सुनील ईघे) पठार भाग अवैध धंदे वाल्यांनी व्यापून टाकला असून सामजिक दृष्टीकोनातून येथील नागरिक असुक्षिततेची भावना व्यक्त करत आहे.दिवसेंदिवस तरूणाई व्यसनाधीन होत चालली आहे.या व्यसनातून विविध तंटे निर्माण होत आहेत.त्यात अवैध धंदे करणारे अमली पदार्थांची तस्करी करणारे किंग धनदांडगे झाल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे.यातून सर्व सामान्य नागरिकांवर अन्याय होत आहे.राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र मूग गिळून बसले आहे.तर अन्न व औषध सुरक्षा विभाग मात्र किरकोळ कारवाई करत आहे.मात्र गुटखा पुरवठादार, अवैध दारू सप्लायर पूर्णतः मोकाट असून अवैध धंदे वाल्यांवर अंकुश राहिलेला नाही.यावर सबंधित प्रशासनाने लवकरात लवकर चांगल्या प्रकारे कारवाई न केल्यास त्यांचे सबंधित कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!