मुंबई कांदिवली / भारत कवितके : कांदिवलीमध्ये शनिवार दिनांक 21 आक्टोंबर 2023रोजी दुपारी 4 वाजता एस.व्ही.रोड, भाजपा उत्तर मुंबई जिल्हा कार्यालयाच्या समोर कांदिवली चारकोप विधानसभा आमदार योगेश सागर यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी विरोधात निषेध मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते.कंत्राटी कामगार भरती चे पाप हे महाआघाडीच्या नेत्यांचेच आहे.या बाबत लोकनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीच्या नेत्यांचा पर्दाफाश केला.आपला नातू तुपाशी,दुसर्याचे पोरं उपाशी. विरोधकांचा डाव फसवा, विद्यार्थ्यांना दिला चकवा.विरोधकांची हुलाहुल, विद्यार्थी दिशाभूल,दुरी तिरी एक्का शरद पवार खोटा सिक्का,अशा आशयाचे फलक व घोषणाबाजी सुरू करून परीसर दणाणून गेला होता.तर देवेंद्र फडणवीस संघर्ष करो, महाराष्ट्र आप के साथ है,
या वेळी मोठ्या प्रमाणात भाजपा पदाधिकारी पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सहभागी झाल्याचे दिसून येत होते.यावेळी भाजपा मंत्री राणी व्दीवेदी, जिल्हा महामंत्री बाबा सिंह, दिलीप पंडित, निखिल व्यास, मंडळ अध्यक्ष बाळा तावडे, जेष्ठ नगरसेवक कमलेश यादव, नगरसेविका लिना देहेकर, प्रतिभा गिरकर, गिरीधर साळुंखे, चारकोप विधानसभा महामंत्री ठाकूर संजय सिंह, योगेश पडवळ, पत्रकार साहित्यिक भारत कवितके सह भाजपा चे महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कांदिवली मध्ये भाजपा आमदार योगेश सागर यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी विरोधात निषेध मोर्चा संपन्न.

0Share