श्रीरामपुर प्रतिनिधी / जितू शिंदे : श्रीरामपूर-आम आदमी पार्टी अहमदनगर जिल्हा तर्फे ओडीसा मध्ये रेल्वे अपघातात 300 हुन अधिक मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना तिलक डुंगरवार जिल्हा संयोजक, विकास डेंगळे तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली नेवासा रोड समर्थ चौक या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली मौन धारन करुन कॅडल मार्च काढण्यात आला या भीषन अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवार यांनी मागणी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवार, तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, राहुल रणपिसे, डॉ. सचिन थोरात, डॉ. प्रवीण राठोड,भरत डेंगळे, एडवोकेट ऑड प्रवीण जमदाडे, बी एम पवार, चेतन बोघे, सचिन आजगे, सनी जाधव, मनोज गाडे, गणेश भडांगे, महेश कौटाळे, मोहन तेलोरे, मनोज बोंबले, भागवत बोंबले, अक्षय कुमावत, आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते