बिलोली प्रतिनीधी / साईनाथ गुडमलवार : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा केन्द्रीय गृह मंत्री मा अमितजी शहा यांची नांदेड येथे 10 जुन ला संध्याकाळी 5 वा अबचलनगर मैदानावर जाहीर सभा होणार आहे. मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त भारतीय जनता पक्षाच्यावतीने मोदी@9 महा जनसंपर्क अभियान 30 मे ते 30 जून पर्यंत हे अभियान राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून देशाचे गृहमंत्री माननीय नामदार अमित शहा यांची सभा 10 जून रोजी सायंकाळी 5 वाजता अबचल नगर नांदेड येथे नांदेड लोकसभेचे प्रमुख आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्रातील राज्याचे मंत्री, खासदार, आमदार, आधी उपस्थित राहून संबोधित करणार आहेत तरी या सभेला मोठ्या संख्येने सर्व भारतीय जनता पक्षाच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी व भाजप प्रेमी शेतकरी व्यापारी कामगार व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हा सरचिटणीस तथा मा. जि.प.सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांनी केले आहे.