राहुरी तालुका प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील कॉलेज रोड ताथेड एजन्सी समोर असणाऱ्या डीपी चे अवस्था खूप गंभीर असून या डीपीचा फ्युज बॉक्स पूर्ण तः उघडा असून बॉक्स चा दरवाजा काढलेला असून दरवाजा तेथे दिसून येत नाही आणि दरवाजा नसल्याकारणाने फ्युज ह्या पूर्णतः उघड्या स्वरूपात आहे या ठिकाणी गुरुवारी आठवडे बाजार भरतो. दिवसभरात हजारो लोकांचा तेथुन वावर असतो या ठिकाणी रोहित्रांल वेलीचा वेढा बघण्यास मिळत आहे, व वेड्या बाभळीचे खूप मोठे झाड या रोहित्रा लगत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा प्रकारचे उघडे स्वरूपात असणाऱ्या डीपी जवळ लोक बाजारात बसणारे भाजी विक्रेते आपले दुकान टाकण्यासाठी पाल लावतात त्याला बांबू , दोरी बांधतात आणि सध्याचे दिवस हे पूर्ण वाऱ्याचे पावसाचे असून या ठिकाणी बांबू जर या डीपी वरती किंवा कुठले प्रकारचे वस्तू या फ्युजांवरती पडल्यास आपघात होण्याची शक्यता असून महावितरण ने वेळेत दक्षता घ्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.