Disha Shakti

राजकीय

स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून ब्राम्हणी गावास घंटा गाडी उपलब्ध

Spread the love

राहुरी  प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून अ.नगर जिल्हा परीषदेच्या वतीने १७० ग्रामपंचायतीना बॅटरीवरील घंटा गाड्यांचे वितरण महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान ब्राम्हणी गावाला मिळालेल्या घंटा गाडीच्या चाव्या सरपंच प्रकाश बानकर, ग्रामविकास अधिकारी माणिक घाडगे, सदस्य उमाकांत हापसे,अनिल ठुबे, रवींद्र वैरागर, सोपान वैरागर आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले.विशेष म्हणजे मेक इन इंडीया या योजनेतून या गाड्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

याप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे , जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!