नांदेड जिल्हा प्रतिनिधी /मिलिंद बच्छाव : दिनांक 21 / 07 / 2023 रोजी नायगाव शहर या ठिकाणी नायगाव शहरासह नायगाव मतदार संघातील भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याच्या वतीने गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांचे जनसंपर्क कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण व उत्तर ग्रामीण नांदेड जिल्हा अध्यक्ष तसेच नांदेड महानगरध्यक्ष पदी सह डॉ. मां श्री संतुकराव हंबर्डे साहेब, यांचा सत्कार सन्मान करत शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या सत्कार सोहळ्यानिमित्त गजानन पाटील चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करत असताना मा श्री सुधाकर भोयर साहेब, भाजपा जिल्हा उत्तर अध्यक्ष मां श्री दिलीप कंदकुर्ते साहेब, नांदेड महानगराध्यक्ष यांची निवड केल्याबद्दल पक्षश्रेष्ठीचे आभार गजानन पाटील चव्हाण यांनी व्यक्त केले.
या सत्कार सन्मान सोहळ्यास उपस्थित मान्यवर भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार, ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, माजी नगरसेवक प्रतिनिधी हरिश्चंद्र पाटील चव्हाण, प्रहार दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष श्रीराम पाटील पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे देगाव, नायगाव भाजपा तालुका अध्यक्ष कोंडीबा पाटील शिंदे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष धनराज शिरोळे, शिवाजी वडपत्रे, माधव पाटील वर्णे, शिवाजी पाटील वडजे, संजय पाटील मोरे, साईनाथ देशमुख, भाजपा सोशल मीडिया तालुका अध्यक्ष सटवाजी मोदलवाड, किशोर महाराज धर्माबादकर, गणपत पाटील मोरे, गंगाधर गोस्केवार, अशोक पाटील पवार, प्रवीण बिरेवार, किरण पाटील मोरे, विठ्ठल बोरीकर, गजानन अशोक चव्हाण, गणेश देगावे, शिवाजी पाटील चव्हाण, सह नायगाव मतदारसंघातील मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण व उत्तर ग्रामीण नांदेड जिल्हा अध्यक्ष तसेच नांदेड महानगरध्यक्ष पदी सह डॉ. मां श्री संतुकराव हंबर्डे साहेब, यांचा सत्कार सन्मान करत शुभेच्छा देण्यात आल्या.
भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मां श्री.संतुकराव हंबर्डे साहेब यांचे नायगाव शहरांमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत

0Share
Leave a reply