प्रतिनिधी / शेख युनूस : राहूरी तालुक्यातील निर्भीड, पत्रकारितेतील धारदार लेखणीतून अन्यायला वाचा फोडणारे तांदूळवाडी येथील आणि राहूरी तालुका पत्रकार विनीत आनंदराव धसाळ यांची राहूरी तालुका येथील संजय गांधी निराधार योजना समितीच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, राज्याचे महसूलमंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिफारशिनुसार व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री पै.शिवाजीराव कर्डीले आणि खासदार. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विनंती नुसार जिल्हाधिकारी सिद्धराम सलीमठ यांनी राहूरी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची निवड केली आहे.
पत्रकार विनीत धसाळ यांची राहूरी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या (सामाजिक क्षेत्र ) अध्यक्ष, सदस्यपदी किरण ससाणे (अनु.जाती) , वैशाली उत्तम खुळे (महिला), अविनाश बाचकर (विमुक्त जाती /भटक्या जमाती), अजित डावखर (सर्व साधारण ), सर्जेराव घाडगे (अपंग ), गोरख अडसूरे (स्व. संस्था प्रतिनिधी ), संदीप आढाव (सामाजिक ), नारायण धनवट (जेष्ठ नागरिक ), दीपक वाबळे (इतर मागास प्रवर्ग ), गटविकास अधिकारी, पंचायत समिती राहूरी (शासकीय सदस्य ), तहसीलदार राहूरी सदस्य सचिव अशा प्रकारे नियुक्ती करण्यात आली असून या निवडीने सर्वांचे अभिनंदन होत आहे.
Leave a reply