मुंबई कांदिवली प्रतिनिधी / भारत कवितके : राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज यात्रेचे आयोजन मुंबई मध्ये शनिवार दिनांक २९ जुलै व ३० जुलै २०२३ या दोन दिवशी राष्ट्रनायक,राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जाणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. मुंबई मधील नागरिकांनी ठिक ठिकाणीं या यात्रेचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जाणकर यांनी आपल्या दिलेल्या मुलाखतीत सांगितले की या जन स्वराज यात्रेचा उद्देश पक्ष वाढीसाठी व लोकांच्या समस्या जाणून घेणे हाच असेल” शनिवार दिनांक २९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता चर्चगेट स्टेशन, हुतात्मा चौक येथून या यात्रेची सुरुवात होईल, चीरा बाजार, नाना चौक ताडदेव, हाजी अली, वरळी जांबोली मैदान, सेंच्युरी बाजार, सिध्दीविनायक मंदिर, शिवाजी पार्क,हिंदुजा हास्पिटल, माहिम, धारावी, कुर्ला, कोर्ट, बीकेसी टर्न, कालीना केला चर्च, प्रभात कालनी, येस बैंक, स्वामी समर्थ मठ, विले पारले पूर्व, अंधेरी महामार्ग, शंकरवाडी बस थांबा, आरे उडान पूल, मालाड पूर्व दिंडोशी,कांदिवली ठाकूर काम्प्लेक्स, चेकनाका, दहिसर रावळपाडा, दहिसर अशोकवन, बोरीवली नैशनल पार्क, बोरीवली देवीपाडा, कांदिवली हनुमान नगर हायवे, मालाड, गोरेगांव, हायवेमार्गे आरे चेकनाका,पिकनिक पोईंट, महात्मा फुले नगर, फिल्टर पाडा, मोरारजी नगर, मुक्काम आरे कॉलनी, रविवार दिनांक ३० जुलै रोजी सकाळी ८ वाजता महानंदा डेअरी पासून यात्रेची सुरुवात होईल. अंधेरी मेट्रो, चकाला, साकी नाका, असल्फा, श्रेयस सिनेमा, विक्रोळी, कांजूर मार्ग, भांडूप, मुलुंड, मुलुंड हायवे ते घाटकोपर, शिवाजी नगर, मानखुर्द, चेंबूर सुमननगर, सायन, माटुंगा सेंट्रल, दादर टी.टी., हिंदमाता,भारत माता, लालबाग, काळाचौकी, काटन ग्रीन, कर्णाक बंदर, जीपीओ राईट टर्न, आझाद मैदान, शेवटी आझाद मैदान येथे संध्याकाळी ७ वाजता सभा होऊन यात्रेची सांगता,समारोप होईल.
Leave a reply