Disha Shakti

राजकीय

आमदार निधीच्या रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार ; संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास आ.लहू कानडे यांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करणार – मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने श्रीरामपूर येथील बांधकाम उपविभाग अधिकाऱ्यांना निवेदन निवेदन देण्यात आले याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की नाऊर खैरी यांच्या मध्यवर्ती शिव रस्ता या रस्त्यामध्ये नुकत्याच झालेले रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे रस्त्याचे काम केले आहे व टेंडर मध्ये साइड गटार मध्ये सिमेंट नळ्या टाकून देण्याचे बंधन कारक असताना साइड गटार मध्ये सिमेंट नळ्या टाकलेल्या नाही.

तसेच साइड गटार खांदताना शेतकर्‍यांचे मालकी जमिनीमध्ये विना परवाना खोदकाम केले आहे. म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच साईड गटार बांधून ठेवल्यामुळे शेतकर्‍यांंना स्वत:च्या शेतात जाण्यास अडथळा निर्माण होत आहे व पेरणी करण्यासाठी व इतर शेत माल नेण्यासाठी शेतकर्‍यांना विनाकारण त्रास सहन करावे लागत आहे.

साइड गटार मध्ये सिमेंट नळ्या न टाकल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास शेतकर्‍यांच्या शेतात पाणी जाऊन शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. शेतकर्‍यांच्या आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून त्वरीत सिमेंट नळ्या टाकण्यात यावे व सिमेंट नळ्या टाकल्याने कोणत्याही शेतकर्‍यांचे शेतात पाणी जाणार नाही याची काळजी घेऊन काम करावे. तसेच नळ्या टाकुन त्याच्यावर व्यवस्थित भर टाकुन व्यवस्थित रस्ता करून देण्यात यावा. तसेच रस्त्याच्या मध्यभागी तीन ठीकाणी चुकीच्या पध्दतीने सिमेंट नळ्या टाकण्यात आलेल्या आहे . चुकीच्या पध्दतीने नळ्या टाकल्याने नायगाव हद्दीतील पावसाचे पाणी जाफराबाद हद्दीतील शेतकर्‍यांच्या शेतात पाणी जावून शेतमालाचे नुकसान होणार आहे.

तरी या नळ्या व्यवस्थित रित्या योग्य त्या ठिकाणी टाकण्यात याव्या. तसेच रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून रस्ता केल्याने व या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे मटेरियल व भेसळ डांबर वापरल्याने संबंधित रस्ता खराब होण्यास सुरवात झाली आहेे.हा रस्ता टेंडर प्रमाणे झालेला नाही व शासकीय नियमाप्रमाणे रस्त्याच्या कामाचे माहिती फलक लावलेले नाही, यामुळे शठेकेदारी शासकीय नियमाचे उल्लंघन केलेले आहे याची गार्ंभीयाने दखल घ्यावी व रस्त्याच्या कामावर सिलकोट व्यवस्थित न केल्याने रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले  असल्याने  रस्त्याचे काम उखरून पुन्हा नव्याने चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरून मजबूत रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून करून घेण्यात यावे व तसेच संबंधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकुन त्याच्या विरूध्द भ्रष्टाचाराचे सर्व कठोर कलम लावून फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कार्यवाही करण्यात यावी.

यापुढे या ठेकेदाराला आपण कोणतेच काम देवू नये.व आमच्या निवेदनाची दखल घेऊन येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये संपूर्ण रस्त्याच्या कामाची कोर टेस्ट करून सर्व कामाची सखोल चौकशी करण्यात यावी व भ्रष्ट ठेकेदाराकडून चिरीमिरी घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी.

येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई न झाल्यास बांधकाम विभागातील अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालून संगम मत करून भ्रष्टाचार करत आहे असे समजून अधिकाऱ्यांसह कार्य व्हावे यासाठी श्रीरामपूर विधानसभेचे आमदार लहू कानडे साहेब यांच्या कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल कारण की बांधकाम विभागातील अधिकारी प्रत्येक ठेकेदाराला सांगतात की मी आमदारांचा मेव्हणा आहे माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही म्हणून या तुमच्या पाहुण्याला तुम्ही भ्रष्टाचार करण्याचा अधिकार दिला काय असे जाब विचारण्यासाठी आमदार कानडे यांच्या कार्यालयासमोर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे असे याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे मनोगत व्यक्त करताना सांगीतले.

याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या की मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांच्या मेव्हण्यांची पाहुणे म्हणून रुबाबात भ्रष्ट काम करणे या अधिकाऱ्यांचे करायचं काय खाली डोकं वर पाय भ्रष्ट अधिकारी श्रीरामपूर कार्यालयातून चालते व्हा भ्रष्ट अधिकाऱ्यांची त्वरित बदली करण्यात यावी असे विविध प्रकारच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्याने कार्यालयातील आधी सर्व अधिकारी कर्मचारी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन मनसे पक्षाचे निवेदन स्वीकारले व त्याप्रसंगी आश्वासन दिले की संबंधित कामाची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करू व टेंडर प्रमाणे सर्व काम करून घेऊन शेतकऱ्यांना न्याय देऊ असे आश्वासन देऊन अधिकाऱ्यांनी मनसेचे निवेदन स्वीकारले

या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपजिल्हाध्यक्ष महेश सोनी,तालुकाध्यक्ष डॉ.संजय नवथर, शहराध्यक्ष सतिश कुदळे, मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष अमोल साबणे , मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष गणेश दिवसे, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष कुणाल सुर्यवंशी, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल लोंढे,विलास पाटणी तालुका संघटक, भास्कर सरोदे, तालुका सचिव,विकी राऊत तालुक सरचिटणीस संदीप विश्वंभर शहर उपअध्यक्ष आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!