Disha Shakti

इतर

गोटुंबे आखाडा येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण ; अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. गोटूंबे आखाडा येथे दिनांक २७ ऑगस्ट रोजी रात्री घडली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अपहरणचा गून्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील १३ वर्षे ११ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तीच्या कुटुंबासह राहुरी तालूक्यातील गोटूंबे आखाडा परिसरात राहते. ती राहुरी शहरातील एका शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ७ वाजेच्या दरम्यान त्या मुलीचे आई वडील घरात जेवण करत होते. त्यावेळी ती अल्पवयीन मुलगी जेवण करुन घरातुन बाहेर गेली.

ती उशीरापर्यंत घरात परत आली नाही. तेव्हा तीच्या नातेवाईकांनी तीचा परिसरात शोध घेतला तेव्हां मात्र ती आढळून आली नाही. त्यामुळे आपल्या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवून नेल्याची तीच्या नातेवाईकांची खात्री झाली. व त्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी सदर घटनेची माहिती राहुरी पोलिस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली. वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गून्हा रजि. नं. ९८२/२०२३ भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गून्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!