विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नगरमध्ये आल्यावर माळी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माळी महासंघ प्रदेश उपाध्यक्ष राम पानमळकर माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, महिला आघाडीच्या, जिल्हाध्यक्ष प्रयागा लोंढे नंदकुमार नेमाने, नितीन डागवाले, संदीप दळवी, अविनाश शिंदे,दत्ताभाऊ राउत राहुल साबळे, तुषार फुलारी, सागर शिंदे, सुनील देठे, संतोष त्रिंबके,उस्मानभाई पठाण, सुनील शिंदे, सुनीता शिंदे, भैरव पडवळे, मिरा पडोळे, आशा आढाव, शारदा ब्राम्हणे, स्वाती शिंदे, अनुसया बोरुडे, संगिता देठे, सुनिता शिंदे, मंगल शिंदे, चंदा शिदे, मिना त्रिंबके आदि उपस्थित होते.
याप्रसंगी रुपालीताई चाकणकर म्हणाल्या, महिला आयोगाच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचे काम होत आहे. महिलांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत, हे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला पाहिजे. त्यांना स्वत:च्या पायाउभे करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. माळी महासंघाच्या माध्यमातून समाजाचे संघटन होत आहे, यात महिलांच्या उन्नत्तीसाठी काम करुन त्यांचे प्रश्न सोडवावेत.
महिलांनीही आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत स्वत:हून पुढाकार घेत तक्रार दिली पाहिजे. अशा महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातूनही महिलांचे संघटन करुन पक्षाच्या माध्यमातून त्यांची उन्नत्ती साधली जाईल, असे सांगितले. याप्रसंगी गणेश बनकर म्हणाले, महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रुपालीताई चाकणकर यांनी महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केले आहे. त्याचबरोबर महिलांच्या उन्नत्तीसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचाही लाभ मिळवून देत आहेत. त्यांच्या धडाडी कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड ही त्यांच्या कार्याची पावती आहे. पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देतील,असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी प्रयाग लोंढे यांनी माळी संघाच्या महिला आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेऊन रुपालीताई चाकणकर यांच्या कार्याचा गौरव केला. सुत्रसंचलन नितीन डागवाले यांनी केले तर आभार तुषार फुलारी यांनी मानले.
Leave a reply