Disha Shakti

क्राईम

श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई, लाखोंच्या मुद्देमालास सराईत मोबाईल चोर जेरबंद

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार ( श्रीरामपूर)  : मोटारसायकल वरून जात असलेल्या इसमाच्या हातातील मोबाईल हिसकावुन पळून जाणा-या चोरटयास पोलिसांनी मुद्देमालासह पकडून गजाआड केलंय. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात, गणेशोत्सवाची लगबग सुरू असतांना. शहरातील वार्ड नंबर १,सिद्धार्थ नगर परिसरातुन दुचाकीवरून जात असलेल्या इसमाच्या हातातील मोबाईल हिसकाविण्याचा प्रकार घडल्याने, संदिप शिंदे यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून. चोरटयांचे वर्णन दिल्यानंतर. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ पोलीस पथक चोरटे ज्या दिशेने पळाले त्या दिशेने रवाना केले असता. काही वेळातच श्रीरामपूर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्याने,आरोपी हा बोरावके कॉलेज परिसरात असल्याची माहिती मिळताच.

त्याठिकाणी जाऊन शहर पोलिसांनी हुसेननगर, वार्ड नं.१ येथील २० वर्षीय आरोपी अरबाज आयुब पठाण, यास ताब्यात घेतले असता. आरोपीकुडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या २० हजार रुपये किमतीचा वन प्लस नोट मोबाईल ,१२ हजार रुपये किमतीचा लिनोव्हो मोबाईल सह गुन्ह्यात वापरलेली एम.एच.17 ए डब्लू 7775 क्रमांकाची हॉन्डा कंपनीची गाडी ताब्यात घेतली असून. गुन्हा घडल्यानंतर काही तासात पोलिसांनी आरोपीस गजाआड केलंय.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!