अ.नगर प्रतिनिधी /शेख युनूस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या दुर्गम डोंगराळ भागात म्हस्कोबा वाडी असून येथील नाथ म्हस्कोबा मंदिर हे भव्य दिव्य असून येथील जिल्हा परिषद शाळा ही तालुक्यातील खेडेगावातील भागातील असून येथील शिक्षक हे आपल्या शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शालेय योजना राबून क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्याचे काम करताना दिसतात.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हस्कोबा वाडी येथील शिक्षक बाळासो. डोमाळे सर , आणि नरसाले सर यांनी आगळा वेगळा उपक्रम राबून प्रत्येकी शालेय विद्यार्थ्यांना एक एक विविध प्रकारच्या रोपांचे झाडे तयार करून एकूण ३८ रोपे लावत आपल्या शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले. यावेळी उपस्थित शालेय विद्यार्थी सह डोमाले बालासो सर, नरसाले सर,अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी शेख युनुस आदि पालक वर्ग उपस्थित होते.
Leave a reply