विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण (पारनेर) : तालुक्यातील काकणेवाडी येथील काकणेवाडी ते तीखोल रस्त्यासाठी सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नातून २३ लाख रुपये निधी मंजूर झाल्यानंतर भूमिपूजनाच्या श्रेयवादावरून स्वयंघोषित गाव पुढार्यांनी सुजित झावरेंवर टीका करताना तसेच गावच्या विकास कामांमध्ये खोडा घालताना विचार करावा व आपण जनतेशी किती बांधिल आहे याचे आत्मचिंतन करावे असे मत ग्रामपंचायत सदस्य भिकाजी वाळुंज व पोपट वाळुंज यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले सदर रस्त्यासाठी आम्ही दोघांनी मागणी केली तसे ठरावाचे पत्र ग्रामपंचायत मधून सुजित झावरे पाटलांना दिले. परंतु टीका करणाऱ्या स्वयंघोषित पुढार्यांनी मागील वर्षी काकणेवाडी ग्रामदैवत लक्ष्मीआईच्या मंदिरात आरतीसाठी पाटलांना बोलवले होते त्यावेळी आम्ही सर्वांनी मिळून रस्त्याची मागणी केली होती. रस्ता मंजूर झाल्यानंतर टीका करणाऱ्यांनी वासुंदे गावात जाऊन सुजित पाटलांचा सत्कार केला तुमचे पाटलांवर प्रेम नाही तर धन्यवादाचा सत्कार कशासाठी केला.
काकणेवाडी गावात सुजित पाटलांच्या माध्यमातून व पंचायत समिती सदस्या सुप्रिया साळवे यांच्या निधीतून ढोकमाळ ते शेपवस्ती रस्ता मुरमीकरण, खैरडी रस्ता कॉंक्रिटीकरण, काकणेवाडी ते काळठिके रस्ता डांबरीकरण अशी १५ लाख रुपयांची कामे सुजित झावरे पाटलांच्या माध्यमातून झाली. तसेच नानासाहेब झावरे यांनी खोदलेल्या विहिरीवरून गावच्या पाण्यासाठी पाईपलाईनसाठी निधी सुजित झावरे पाटील व सुप्रिया साळवे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला.
हे केवळ जनतेशी बांधील असल्यामुळे शक्य आहे तर भाजपच्या स्वयंघोषित निष्ठावंत जेष्ठ नेत्यांनी सुजित झावरेंवर निधीच्या संबंधित आरोप केला. अहो साहेब आपण भाजपचे असुनही कै.माजी आमदार वसंतराव झावरेंकडे काकणेवाडी गावातील एका कार्यक्रमात शाळा खोल्यांसाठी निधी मागितला. त्यांनी पक्षाचा विचार न करता एका शब्दावर तात्काळ निधी उपलब्ध करून दिला होता. हे तुम्ही आता विसरले त्यामुळे झावरे कुटुंबावर टीका करताना विचार करा. असे परखड मत काकणेवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य भिकाजी वाळुंज व पोपट वाळुंज यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
सरपंच पदाचा उमेदवार आयात का करावा लागला ?
सुजित पाटलांवर आरोप करणारे इतके जनतेशी बांधील आहे की यांना सरपंच पदाचा संभाव्य उमेदवार आयात करावा लागला. गावात एवढे पुढारी असुन सरपंच पदाचा उमेदवार मुंबईहून आयात करावा लागतो याचे आत्मचिंतन करावे व आपली जनतेशी असलेली बांधिलकी ओळखावी असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य पोपट वाळुंज यांनी केले.
काकणेवाडीच्या स्वयंघोषित गाव पुढाऱ्यांनी सुजित झावरेंवर बोलू नये भिकाजी वाळुंज, पोपट वाळुंज यांचा विरोधकांवर घणाघात

0Share
Leave a reply