शेख युनूस / अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील संगमनेर नगरपालिका कला दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब.ना. सारडा विज्ञान महाविद्यालय संगमनेर कॉलेजची विद्यार्थिनी पवार अमृता ज्योती पोपट हिने, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
तर ऑनलाईन राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये पवार अमृता हिने, राज्यस्तरीय उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे, तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन हस्ताक्षर स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर पवार अमृता हिचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठित पत्र देऊन सत्कार केला गेला.
पवार अमृता ही राहणार निळवंडे येथील असून आपल्या आई-वडिलांसोबत ती राहते, आई वडील शेती करून पवार अमृता हीच शिक्षण पूर्ण करतात, अमृता हिला राजकीय छंद असून मोठ्या मोठ्या माणसांमध्ये फिरण्याचा मोठा छंद आहे, तसेच मोठ्या राजकीय लोकांकडून गोरगरिबांची सेवा करणे हे देखील तिचं काम आहे, तर तिच्या या यशामागे तिचे आई-वडील तसेच सौ कानवडे मॅडम तसेच प्रसाद दादा करनावट, अडव्होकेट संध्या ताई सोनवणे, संगमनेर कॉलेजचे सर्व शिक्षक इतर कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. तर उत्तेजनार्थ तसेच दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल संगमनेर तालुक्याच्या वतीने अमृता पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Leave a reply