नाशिक प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : मुळा पाटबंधारे अहमदनगर येथील कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा आधिकारी यांनी मिळून मिसळून चालवलेल्या भ्रष्टाचार भरपूर प्रमाणात अनेक वर्षापासून चालू आहे या करिता आम्ही अधीक्षक अभियंता नाशिक जलसंपदा विभाग यांना वारंवार तक्रारी केल्या परंतु त्यानी संबधीत अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले व त्यांच्या कर्तव्यात कसूर केला म्हणून राजेश शिंदे यांनी मुख्य अभियंता यांच्या कड़े तक्रारी केल्या त्यांनी अधीक्षक अभियंता यांना सूचना व आदेश केले
परंतु अधीक्षक अभियंता यांनी मुख्य अभियंता यांनी त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली म्हणून राजेश शिंदे यांनी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश सिंचन भवन या ठिकाणी उपोषणास आज सोमवार पासून सुरुवात केली सबंधित आधिकारी यांच्या वर योग्य ती कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहिल हि पावित्रा राजेश शिंदे पाटिल यांनी घेतला आह़े.
छावा बिग्रेडचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश शिंदे यांची मुळा पाटबंधारे अहमदनगर यांच्या विरोधात उपोषणास सुरुवात

0Share
Leave a reply