Disha Shakti

क्राईम

श्रीरामपूर तालुक्यातील रामपूरमध्ये शेती बांधाच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / गणेश राशीनकर : तालुक्यातील गोदापट्ट्यातील रामपूरमध्ये शेताच्या बांधावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून त्यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर येथील दीपक लक्ष्मण खेमनर यांच्या शेतात बांधावर पोल लावण्याचे काम सुरू असताना अचानक लगतचे शेतकऱ्यांचे बांधावरून वाद सुरू झाले. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. सागर सोमनाथ क्षत्रिय हा कशाच्या तरी सहाय्याने एकाच्या पोटावर वार करायच्या तयारीत असताना दीपक खेमनर यांनी मध्येच हात धरल्याने अंगठ्या शेजारील बोटाला गंभीर दुखापत होऊन जखमी झाले आहे.

जखमींना प्राथमिक उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये सागर सोमनाथ क्षत्रिय, आकाश सोमनाथ क्षत्रिय, सोमनाथ शरद क्षत्रिय, शरद यशवंत क्षत्रिय, पुष्पा सतीश क्षत्रिय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!