Disha Shakti

इतर

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना दिलासा, संगमनेर न्यायालयाकडून जामीन मंजूर

Spread the love

संगमनेर प्रतिनिधी / युनूस शेख : दोन वेळा न्यायालयासमोर हजर राहण्याचे समन्स बजावूनही समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) हे हजर झाले नाही, आज शुक्रवारी यावर प्रकरणावर तिसरी सुनावणी होती. मात्र इंदोरीकर महाराज यांनी काल सकाळी 11 वाजता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर राहत अटकपूर्व जामीन मिळविला आहे.

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या विरुद्ध पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी जामीनासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यावर मंगळवार दि. 21 रोजी सुनावनी झाली. मात्र इंदोरीकर हे न्यायालयासमोर हजर न झाल्याने या प्रकरणाची सुनावणी आज शुक्रवार दि. 24 नोव्हेंबर रोजी होणार होती.

मात्र इंदोरीकर महाराज यांनी सर्वांना चकवा देत वकील के. डी. धुमाळ यांच्या मार्फत संगमनेर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. वाघमारे यांच्यासमोर सकाळी 11 वाजता जामीनासाठीचा अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता इंदोरीकर महाराज हे न्यायदंडाधिकारी यांचेसमोर हजर झाले.

कीर्तनाच्या तारखा वर्ष-वर्ष आधी घेतलेल्या असतात त्यामुळे ऐन वेळी कार्यक्रम रद्द केल्याने आयोजकांचे नुकसान होते असा युक्तीवाद इंदोरीकर महाराज यांचे वकील धुमाळ यांनी न्यायालयासमोर केला. यानंतर न्यायालयाने वैयक्तिक जातमुचलक्यावर इंदोरीकर महाराज यांची जामीनावर सुटका केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!