अहमदपूर प्रतिनिधी / नंदराज पोले : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते तथा विधानसभा प्रमुख चाकुर अहमदपूर माननिय श्री गणेश दादा हाक्के यांचा व भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस श्री माणिकराव नरवटे यांचा अहमदपूर तालुक्यातील समस्त भोई समाजातर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
मा. गणेश दादा पाटील यांनी अहमदपूर चाकुर तालुक्यात विकास कामाचा धडाका लावला आहे, त्यांनी लांजी येथील भोई समाज सभाग्रहासाठी 10 लाख रुपये मंजूर केले आहेत, तसेच अहमदपूर मध्ये विविध ठिकाणी सिमेंट रोडचे काम मंजूर केले आहे, त्यामूळे अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर, लांजी तसेच शेनकुड येथील समस्त भोई समाजातर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भिवाजी चिलकरवार, उमाजी हरणे, विनोद पोपतवार, माधव पोपतवार, राजू चिलकरवार, सोसायटीचे चेअरमन गंगाधर कोमटे, विकास पोपतवार, डिगांबर हिवरे, बळीराम चिलकरवार, सुदाम हिवरे, संतोष अनंतवाळ, रामजी कोमटवार, मुकेश अनंतवाळ, मुकेश कोमटवार, सुभाष हिवरे, पांडूरंग पोपतवार, बालाजी डुकरे, गोरख कोमटे, प्रकाश चिलकरवार, गोपाळ हरणे, दिंगबर डुकरे, विलास डुकरे, अनिकेत डुकरे इत्यादी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते तथा विधानसभा प्रमुख मा. गणेशदादा हाक्के यांचा अहमदपूर तालुक्यातील समस्त भोई समाजातर्फे भव्य सत्कार…

0Share