Disha Shakti

सामाजिक

शेतकरी प्रश्नांसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाचा हल्लाबोल मोर्चा 

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे  : सध्या राज्यात दुहेरी दुष्काळाचे संकट आहे. अशा परिस्थितीत सरकारने कांदा आणि दूध दराबाबत शेतकऱ्यांना दिवाळखोरीत काढले आहे. एकीकडे राज्य सरकारने हमीभाव देऊनही दूध संघाकडून व खाजगी प्रकल्पांकडून शासकीय दराची अंमलबजावणी होत नाही तर दुसरीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद करून कांद्याचे दर दोन हजार रुपयांनी खाली आणले आहेत.               

         राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कांदा निर्यात बंदी उठवावी, दुधाला शासकीय हमीभाव मिळावा, रखडलेली अनुदाने शेतकऱ्यांना मिळावीत, इथेनॉल प्रकल्पावरील बंदी तत्काळ उठवावी अशा अनेक प्रश्नांसाठी १२ डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.यावेळी कांदा व दूध दर प्रश्नासाठी शेतकरी नेते आदिनाथ देवढे यांनी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आक्रमकपणे भूमिका घ्यावी. दुध प्रश्नासाठी संबंधित यंत्रणावर कारवाई करून कांद्यावरील निर्यात बंदी उठवून सरकारने लवकरच योग्य निर्णय घ्यावा अशी भूमिका त्यांनी आपल्या भाषणातून मांडली.

यावेळी काँग्रेस युवा नेते प्रकाश शेलार यांनी ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्या बाबत आक्षेप घेत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे अशी टीका केली.त्यानंतर काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, काँग्रेस जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, काँग्रेस ओबीसी सेलच्या मंगल भुजबळ यांची भाषणे झाली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी दूध दराबाबत व कांदा निर्यात बंदी याबाबत सरकारवर निशाणा साधत माध्यमांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी काँग्रेस ज्येष्ठ नेते अंकुशराव कानवडे,काँग्रेस युवा नेते प्रकाश शेलार, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस आदिनाथ देवढे,जिल्हा सरचिटणीस महेंद्रजी सोलाट, पाथर्डी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष संजय गोरे,युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष संभाजी पाठक, पाथर्डी काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता पाठक, सामाजिक न्याय विभाग काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अशोकरावजी गाडेकर, पाथर्डी तालुका काँग्रेस सरचिटणीस शंकरराव मिरपगार, नितीनरावजी खंडागळे आदी कार्यकर्त्यांसहीत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!