Disha Shakti

सामाजिक

कुंटूर येथे २४ डिसेंबर रोजी संविधान जागृती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ मिलींद बच्छाव : नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल च्या प्रांगणात दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी संविधान जागृती महोत्सव समितीच्या वतीने संविधान जागृती महोत्सव सोहळा नायगावचे तहसीलदार श्रीमती मंजुषा भगत यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून जनमानसात भारतीय संविधान व आपले हक्क आणि कर्तव्य याबद्दल अनेकांना जानिव नसल्याने अशा नागरिकांची जागृती व्हावी या उद्देशाने संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास कुंटूर परिसरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी व संविधान प्रेमी जण हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. संविधान जागृती महोत्सव सोहळ्याच्या संत गाडगे बाबा विचार मंचावर नायगाव चे तहसीलदार श्रीमती मंजुषा भगत , ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर, जेष्ठ विचारवंत अँड.मा.विजयअण्णा गोणारकर नांदेड, कुंटूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे, दतात्र्य आईलवार , युवा उद्योजक कैलास बोंडले, यांचे संविधानावर सखोल असे उपस्थित जनांना मार्गदर्शन लाभले.

याप्रसंगी कुंटूर नगरीचे उपसरपंच शिवाजी पाटील होळकर, प्रा.गो.रा.परडे, ग्रामसेवक मिलिंद जोंधळे, संजयशिंह राजपूत, कचकलवाड, प्रमोद फकीरे ,धम्मानंद सोनकांबळे उपसरपंच रातोळी ,नागसेन जिगळेकर उपसरपंच जिगळा, भास्कर भेडेकर, सर्जेराव सोनकांबळे, राहून गायकवाड भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष शाखा रातोळी, ज्ञानेश्वर रावजी सूर्यवंशी धनंजकर, पत्रकार दतात्र्य संगेवार ,पत्रकार शंकर आडकीने, पत्रकार मनोहर तेलंग, पत्रकार गोविंद नरसीकर ,पत्रकार अनिल ढवळे , पत्रकार विशाल भद्रे ,पत्रकार मिलिंद बचाव ,पत्रकार संभाजी भोपाळकर, पत्रकार गजानन चौधरी, पत्रकार बाळासाहेब पांडे ,पत्रकार नागेश कल्याण, पत्रकार एस.एम.मुदखेडकर, पत्रकार देविदास जेठेवाड ,पत्रकार लक्ष्मण बर्गे ,पत्रकार शेषराव कंधारे ,पत्रकार गंगाधर गंगासागरे , पत्रकार प्रकाश महिपाळे आदीजन उपस्थित होते, तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ सोनकांबळे यांनी केले तर आभार मालोजी भाऊराव झगडे यांनी मानले.

रॅलीत शकंडोजन सहभागी.. संविधान जागृती सोहळ्यानिमित्त दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता कुंटूर येथील पोलीस ठाण्यापासून संविधान रॅलीचे उदघाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या रॅलीत तिरंगा झेंडा हाती घेऊन, संविधानाच्या प्रतीची ,प्रास्ताविकेच्या प्रतीची व संविधानाला अभिप्रेत घोषणा देत प्रमुख रस्त्याने रॅली शकंडो जणांच्या सहभागातून जिल्हा परिषद हायस्कूल नियोजित कार्यक्रमस्थळी पोहचली.

कुंटूर येथे हजारोंच्या संख्येत संपन्न झालेल्या संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन प्रा.के.टी. हणमंते,बालाजी हणमंते ,माधव केरबा धडेकर , दतात्र्य आईलवार सरपंच सुजलेगाव ,मालोजी झगडे , सुधाकर डोईवाड ,मंगेश हनवटे केंद्र प्रमुख, शंकर आडकिने, संदीप पा.जाधव, प्रकाश महिपाळे,शेख रसूल, ज्ञानेश्वर पा.सूर्यवंशी ,माधव लव्हाळे, प्रकाश धडेकर, आदींसह कुंटूर सर्कल यांनी केले होते.

जाहीर आभार….
संविधान जागृती सोहळ्याचे आयोजन केलेल्या सर्व पत्रकार व त्यांचे सहकारी यांचे जाहीर अभिनंदन करत आपल्या लेखणीची धार अँड.विजय गोणारकर व धर्मकीर्ती महाराजांच्या वाणीतून जनते समोर अतिशय दमदार वाणीतून संविधान जागृती मांडणी केली,व संविधान जागृतीचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कुंटूर सर्कल मधील पत्रकार बांधवांचे जाहीर आभार, अभिनंदन करतो.
= रामदासजी कांबळे
रुई(खु.)ता.नायगाव


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!