Disha Shakti

सामाजिक

पत्रकार दिनानिमित्त स्नेहसदन चर्च येथे राहुरीतील पत्रकार सन्मानित

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : (राहुरी) : ६ जानेवारी पत्रकार या दिनाचे औचित्य साधून राहुरी येथील स्नेहसदन चर्च येथे ७ जानेवारी रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील पत्रकारांना सन्मान करण्यात आले. राहुरी येथील स्नेह सदन चर्चेचे प्रमुख धर्मगुरू फादर राजु शेळके, साहाय्यक धर्मगुरू फा. जेकब गायकवाड यांच्याहस्ते उपस्थित पत्रकार बांधवाना डायरी पेन, गुलाबपुष्प देवून सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी हे होते तर व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर फादर राजु शेळके, फादर जेकब गायकवाड, रमेश ब्राम्हणे, रत्नाकर दोंदे हे उपस्थित होते.

याप्रसंगी फादर शेळके, पत्रकार राजेंद्र वाडेकर, संजय कुलकणी, रमेश ब्राह्मणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकारांच्या वतीने स्नेह सदन चर्चच्या कमिटीचे आभार मानले. व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नाकर दोंदे, संजय जाधव , नवीन साळवे, किरण पवार व प्रकाश भोसले दोंदे गुरुजी दिपक मकासरे यांनी परीश्रम घेतले यावेळी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होते. या सूत्रसंचालन पत्रकार राजेंद्र पवार यांनी केले स्नेहसदन चर्च तर्फे प्रकाश भोसले व राजेंद्र साळवे यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!