धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : संत परीक्षक श्री.संत गोरोबा काकांच्या समाधीमुळे प्रसिद्ध असलेल्या तेरमध्ये ता.७ रोजी सफला एकादशी निमीत्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शन घेतले. काकांच्या दर्शनासाठी आसपासच्या परिसरातील मोठ्या प्रमाणात दिंड्या दाखल झाल्या होत्या. ठिकठिकाणी भजन व कीर्तन चालू होते. दर्शनासाठी तेरसह, लातूर, मुळेवाडी, रामवाडी, भंडारवाडी, कोळेकरवाडी, कोळेवाडी, पानवाडी, थोडसरवाडी, गोवर्धनवाडी, हिंगळजवाडी, पवारवाडी, ढोकी , जागजी,कोंड, येथील भाविक आले होते. मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी असल्यामुळे हजारो भाविकांनी सकाळपासूनच श्री.संत गोरोबा काकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले होते परंतु एस.टी.महामंडळाच्या बसेसचे गणित कोलमडले होते. एसटी बसेस वेळेवर येत नसल्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तासनतास बस स्थानकावर गाड्यांची वाट पाहत बसावे लागले बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने शौचालयासाठी पाणी नसल्याने भाविकांची गैरसोय झाली कमीत कमी एकादशी दिवशी तरी एस.टी. महामंडळाने तेर मार्गावरती ज्यादा बसेस सोडाव्यात अशी मागणी भाविकातून होत आहे.
तेरमध्ये सफला एकादशी निमीत्त श्री.संत गोरोबा काकांच्या समाधीस्थळी भाविकांची आलोट गर्दी एस.टी.महामंडळाकडून प्रवाशांची गैरसोय

0Share
Leave a reply