प्रतिनिधी / नागनाथ पाटील : हत्तुरे नगर-दि.10 जानेवारी, 2024 रोजी ग्रामदैवत श्री सिद्धेरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त नंदीध्वज व पालखी मिरवणूक हत्तुरे नगरातून बुधवार रोजी सकाळी 8.00 वाजता श्री.मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय,श्री सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा व मल्लिकार्जुन बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आली.
यावेळी यात्रेसारखीच वातावरण निर्मिती झाल्याने हत्तुरे नगरवासीयानी सिद्धेश्वर यात्रेचा अनुभव घेतला. प्रारंभी नंदी ध्वज व पालखीचे पूजन प्रमुख मानकरी जगदीश हिरेहब्बू, मनोज हिरे हब्बू, संजय हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू,धरेप्पा हत्तुरे यांच्या शुभहस्ते मा.मुख्याध्यापक वैजिनाथ हत्तुरे, संस्थेचे अध्यक्ष सिद्धप्पा वरनाळ, ग.शि.बापूराव जमादार,केंद्र प्रमुख सिद्राम वाघमोडे, अब्बास शेख,प्रकाश राचेट्टी, लोकमतचे सहसंपादक रेवणसिद्ध जवळेकर, दिव्य मराठीचे पत्रकार विनोद कामतकर, संजय जाधव यांच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी मान्यवरांचे शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर नगरातून बाराबंदीतील मुलांच्या हातात श्री सिद्धेश्वर यात्रेप्रमाणे सात प्रतिकात्मक नंदी ध्वज, पालखी,कावड व भगवे झेंडे घेऊन विद्यार्थ्यांनी बोला बोला एकदा भक्त लिंग हर्र…बोला…हर्र… श्री सिद्धेश्वर महाराज की जय ‘ अशा घोषणा देत,व बँजो व ढोल ताशाच्या आवाजात श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा जागर करत मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत शेकडो बालचमू बाराबंदीच्या वेशभूषेत,तर मुली पारंपरिक वेशभूषेत दाग-दागिने घालून नटून-थटून सहभागी झाले होते.नंदी ध्वज व पालखीच्या स्वागतासाठी प्रशालेकडून व हत्तुरे नगर वासीयाकडून रांगोळीच्या पायघड्या काढण्यात आले होते. मिरवणुकी दरम्यान हत्तुरे परिवार व पालक भक्तगणाकडून नंदीध्वज व पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.या मिरवणुकीत ढोल पथक,टाळ पथक,लेझीम पथकातील मुलानी व कर्नाटकी बाहुल्यांनी नागरिकांचे लक्ष आकर्षित करून घेतले.
या कार्यक्रमास वेदमूर्ती बसवराज शास्त्री,पर्यवेक्षक गिरमल्ला बिराजदार, प्राथ.मुख्या.सचिन जाधव, काशिनाथ मळेवाडी,सुधाकर कामशेट्टी,रितेश हत्तुरे, मारुती माने, बसवराज कोरे,सविता कुलकर्णी, प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व नगरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी प्रा . लक्ष्मीकांत पनशेट्टी, अनिलकुमार गावडे, गणेश कोरे,सुकेशनी गगोंडा, अनिता हौदे,रमेश आगवणे, गंगाराम घोडके, परमेश्वर चांदोडे,संतोष स्वामी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
श्री मल्लिकार्जुन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची हत्तुरे नगरातून नंदीध्वज व पालखी मिरवणूक

0Share
Leave a reply