प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे रणसिंग फुंकून मुंबई कडे कूच केले आहे. अंतरवाली ते मुंबई असा दौरा करत असतांना पाथर्डी तालुक्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आगसखांड फाट्या नजिकच्या मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामधील सहभागी आंदोलकांना पाथर्डी तालुक्याच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी जमलेल्या सभेला संबोधित करत शेवटच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी लढाई करणार असल्याचे सांगितले.त्यानंतर ही रॅली पाथर्डी येथे पोहोचली. पाथर्डी येथील नाईक चौकामध्ये पाथर्डी तालुक्यातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. नाईक चौकामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने चहा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.संघर्ष योद्धा मा. मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलन घेऊन मुंबईकडे कुच करत असतांना पाथर्डी तालुका मुस्लिम बांधवांच्या वतीने त्यांचा अत्यंत शानदार पद्धतीने स्वागत करण्यात आले.
सर्व आंदोलकांना मुस्लिम बांधवांच्या वतीने चहा, पाणी फराळाची व्यवस्था सुरू होती.मा. मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःहून भेट देऊन तालुक्यातील मुस्लिम बांधवांशी चर्चा केली. यावेळी तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी जोपर्यंत आपले आंदोलन यशस्वी होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढणार असे अभिवचन दिले.पाथर्डी तालुका मुस्लिम बांधवांच्या सत्काराचा यथोचित स्वीकार करून धन्यवाद आणि आभार व्यक्त केले आणि मुस्लिम बांधवांचे प्रेम आणि सहकार्य मी शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले.
पाथर्डी तालुका मुस्लिम बांधवांच्या वतीने महाराष्ट्र योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे शानदार स्वागत..

0Share
Leave a reply