विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक ३०/०१/२४ रोजी फिर्यादी आरती योगेश शेळके वय २६, रा. कोथुळ, ता. श्रीगोंदा हिचे राहते घरात अनोळखी ४ इसमांनी अनाधिकाराने प्रवेश करुन फिर्यादीचे पती मयत योगेश सुभाष शेळके हे झोपलेले असताना त्यांचे गळ्यावर, हातावर, उजव्या पायावर कोयत्याने वार करुन गंभीर दुखापत करुन जिवे ठार केले तसेच फिर्यादीचे गळ्यास कोयता लावुन आरडा ओरडा केल्यास जिवे मारण्याची धमकी दिले बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन वेलवंडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७/२०२४ भादविक ३०२, ४५२, ५०६, ३४ आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना गंभीर स्वरुपाची असल्याने मा. श्री. राकेश ओला साहेव, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी घटना ठिकाणास भेट देवुन पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना ना उघड गुन्हा उघडकिस आणुन आरोपींचा शोध घेवुन ताब्यात घेणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये दिनांक ३०/०१/२४ रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, सफौ/बबन मखरे, पोहेकों/बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, पोना/फुरकान शेख, पोकों/रविंद्र घुगांसे, मच्छिद्र बडे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, आकाश काळे, मपोना/भाग्यश्री भिटे, सोनाली साठे, ज्योती शिंदे, चासफो/उमाकांत गावडे, चापोहेकों/संभाजी कोतकर व भरत बुधवंत अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे २ विशेष पथके तयार करुन सदर ना उघड गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवून पथके रवाना केली.स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घटनास्थळाची पहाणी करुन आजु बाजूला विचारपुस केली असता घटनाक्रम पहाता फिर्यादीवरच पथकाचा संशय बळावला होता. परंतु सुरुवातीला तांत्रिक विश्लेषणात घटनेला कोणताही आधार मिळत नसल्याने मयताचे घरी नेहमी येणारे तसेच त्याचे सोबत दारु पिणारे ४ ते ५ इसमांना पथकाने ताब्यात घेतले होते. फिर्यादी पत्नी आरती हिनेपण वरील ताब्यात घेतलेल्या इसमांचा समावेश असल्याचे सांगुन पथकाची दिशाभुल केली होती. तरीही पथकाला घटनेचे सत्यते बाबत तसेच फिर्यादी सांगत असलेल्या आरोपीं बाबत खात्री पटत नव्हती. म्हणुन साधारण दोन दिवस कोथुळ गावातुन माहिती गोळा करताना तसेच तांत्रिक विश्लेषणा दरम्यान मयताचा भाचा शुभम लगड याचे मोबाईलवर रोहीत साहेबराव लाटे वय २३, रा. कोथुळ, हल्ली मुक्काम पुणे याचा घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आलेला दिसुन आला. त्या प्रमाणे पथकाने पुणे येथे जावुन रोहीत लाटे याला विश्वासात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली. त्यावेळी त्याने मयताची पत्नी आरती व त्याचे प्रेमाचे संबंध होते. त्यावरुन मयत योगेश हा त्यांच्या अनैतिक संबंधाचे संशयावरुन आरतीस नेहमी दारु पिऊन शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने दोघांनी मागिल १५ दिवसा पूर्वी पासुन नियोजन करुन इसम नो अनिश सुरेंद्र धडे वय १९, रा. पुणे याचे मध्यस्थीने पृथ्वीराज अनिल साळवे, वय १९, विराज सतिष गाडे वय १९, शोएब महमंद बादशाह वय २२ व आयुष शंभु सिंह वय १८ यांना दिड लाख रुपये देण्याचे कबुल करुन त्यांचे मदतीने २ मोटार सायकलवर त्यांचेसह येवुन खुन केल्याचे सांगितले. तसेच रोहीत व आरती यांचेतील संबंधाची कोणाला माहिती मिळु नये म्हणुन स्नॅपचॅट या सोशल मिडीया अॅपचा वापर करुन ते संपर्क साधत असल्याचे निष्पन्न झाले होते. वर नमुद आरोपींचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना विविध ठिकाणावरुन ताब्यात घेतले.
आरोपी नामे १) आरती योगेश शेळके वय २६, २) रोहीत साहेबराव लाटे वय २३, दोन्ही रा. कोथुळ, ता. श्रीगोंदा ३) शोएब महमंद बादशाह, वय २२ रा. सेक्टर डी लाईन, ट्रॉम्बे, मुंबई ४) विराज सतिष गाडे, वय १९ रा. सोलापुर बाजार, कॅम्प पुणे, ५) आयुष शंभु सिंह, वय १८, ६) पृथ्वीराज अनिल साळवे, वय १९, ७) अनिश सुरेंद्र धडे वय १९ तिन्ही रा. घोरपडे पेठ, पुणे यांना बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहेत.अहमदनगर जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या राहुरी येथील वकिल दांम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करुन खुन व कोथुळ, ता. श्रीगोंदा येथील प्रेम प्रकरणातुन सुपारी देवुन झालेला खुन अशी दोन्ही प्रकरणे पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थागुशा व पथकाने संवेदनशिलरित्या हाताळून दोन्ही गुन्हे उघडकिस आणल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी ३५,०००/- रुपये रोख बक्षिस जाहिर केले आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, व श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
कोथुळ खुन प्रकरण, पत्नीनेच दिली पतीच्या खुनाची सुपारी, आरोपी प्रियकरासह ६ आरोपी पुणे येथुन जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0Share
Leave a reply